डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज समन्वय समितीतर्फे ९ रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी : डाॅ.आंबेडकर समन्वय समितीच्या वतीने समाजातील दहावी,बारावी,शिष्यवृत्ती परीक्षा,पदवी परीक्षा या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक ९ जून रोजी सकाळी

१० वाजता सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न होणार आहे.

यावेळी समन्वय समिती अध्यक्ष श्री.केशव जाधव,मार्गदर्शक म्हणून महेंद्र ॲकडमीचे महेंद्र पेडणेकर,समाज कल्याण निरीक्षक सुनिल बागुल,आय.टी.आय चे निर्देशक रामचंद्र जाधव,बार्टीचे सगुण जाधव हे स्पर्धा परीक्षा,समाज कल्याण मार्फत दिल्या जाणाऱ्या शिक्षवृत्त्या,जातपडताळणी,आय.टी.आय मधून दिले जाणारे विविध कोर्सेस यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी उपाध्यक्ष जगदिश चव्हाण सर,सचिव विनायक जाधव, कांता जाधव,मोहन शेर्लेकर (पत्रकार),अनिल जाधव ,महादेव असनकर,सुरेश जाधव,निता निगुडकर व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सावंतवाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प,सन्मानचिन्ह,शालेय उपयोगी साहित्य भेट म्हणून देणार आहेत.

तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत पालकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.