पिरलोटे नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू प्रकरणी चालकावर गुन्हा

गुणदे- तलारीवाडीतील तरुण , अज्ञात अवजड वाहन चालकाविरोधात गुन्हा

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील गुणदे – तलारीवाडी येथील राकेश रमेश माने या २७ वर्षीय तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी येथील पोलिस स्थानकात अज्ञात अवजड वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. हि घटना . ३१ मे २०२४ रोजी पहाटे ४ : ३८ वाजताचे पूर्वी मुंबई-गोवा जाणाऱ्या दुपदरी रोड साईरले एक्सल फाटा ते पिरलोटे बाजूच्या दरम्यान घडली होती

या प्रकरणी खेड पोलीस ठाणे अंतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार उदय संभाजी भोसले यांनी या अपघाताची फिर्याद येथील पोलीस स्थानकात ५ जून रोजी दिली आहे.
तालुक्यातील गुणदे – तलारीवाडी येथील राकेश रमेश माने हा तरुण . ३१ मे रोजी पहाटे ४ : ३८ वाजताच्या पूर्वी आपल्या ताब्यातील मोटारसायकल ( क्र.एम – एच- ०८ -एक्स- २८८४) ने एक्सल फाटयाच्या बाजूने मुंबई गोवा हायवे रोडने आपल्या साईडने पिरलोटे बाजूकडे जात असताना त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात अवजड वाहनावरील चालकाने त्याच्या पाठीमागून मोटारसायकलला ठोकरून अपघात केला यात स्वार राकेश माने हा मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याने त्याचे डोके व कवटी फुटुन रक्तस्त्राव झाला त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या दुखापती होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघात झाल्यानंतर अज्ञात अवजड वाहनावरील चालक अपघाताच्या घटनास्थळी न थांबता व गंभीर जखमीस वैद्यकीय सुविधा न पुरविता चिपळूण बाजूकडे पळून गेला .अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत