Attempt to break ATM in Dapoli; Filed a case
दापोली | प्रतिनिधी: दापोलीतील कोकण कृषि विद्यापीठाचे मेनगेटच्या बाजूला असलेल्या एस.बी.आयचे एटीएम मशिन फोडण्याचा अज्ञाताने अयशस्वी प्रयत्न केला. या अज्ञात इसमाने ४ मे रोजी रात्रौ एस.बी.आय बँकेचे एटीएममध्ये प्रवेश करून एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच एटीएममधील कॅश काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
या अज्ञात इसमाने एटीएम रूमच्या आतील व बाहेरील बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याची देखील मोडतोड केली आहे. याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.