भारतीय संस्कृतीचा जर्मनीत जागर

 

माखजन |वार्ताहर : जर्मनी मध्ये दरवर्षी ब्राऊनशवाईंग शहरात ‘ब्राऊनशवाईंग इंटरननॅशनल’ हा कार्यक्रम थाटामाटात साजरा होत असतो.या कार्यक्रमात ३० संस्थानी विविध देशांचे प्रतिनिधित्व करत आपले सादरीकरण केले.
यामध्ये या पूर्ण कार्यक्रमाचा प्रारंभ ब्राऊनशवाईंग येथील ब्रावो मराठी मंडळाने मराठमोळ्या पद्धतीच्या सादरीकारणाने केला.याला जगभरातून उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ढोल,ताशे,लेझीम यांच्या सादरीकारणाने भारतीयांनी उपस्थितांची मने जिंकली.

 

भारतीय खाद्य संस्कृती कळवी यासाठी भारतीयांनी अन्य देशांच्या फूड स्टॉल सोबत,भारतीय खाद्य पदार्थांचा स्टॉल लावला होता.वडापाव,दाबेली पाणीपुरी,डोसा, व अन्य खाद्य पदार्थांसोबत मँगो लस्सी,कैरीचे पन्हे आदी शितपेये देखील ठेवण्यात आली होती.दुपारच्या सत्रात ब्रावो मराठी मंडळातर्फे पुण्याच्या प्रख्यात गायिका सौ संगीता मालकर यांचे गायन ठेवले होते.त्यांनी आपल्या गायनात भारतीय संगीताचे अनेक पैलू उलगडून दाखवले.यावेळी त्यांना तबला साथ अभिराम भावे,तर अथर्व वैशंपायन यांनी बासरीची साथ दिली.सायंकाळी ब्रावो मराठी मंडळाने नृत्य सदर केले.शेवटी गरब्याचे रंग उधळत कार्यक्रमाची सांगता झाली.
जर्मनी सारख्या प्रगत देशात भारतीय संस्कृतीच्या सादरीकारणाला वावं मिळाल्याने,भारताचा झेंडा अटकेपार नेता आल्याचे सहभागी भारतीयांनी सांगितले