रत्नागिरी : प्रतिनिधी
समुद्राच्या पाण्यात पडून नेपाळी खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 3 नोव्हेंबर रोजी अकाळी 8 वा. सुमारास मिरकरवाड़ा जेटी येथील समुद्राच्या पाण्यात निदर्शनास आली.
समित तेजराम चौधरी (मुळ रा. नेपाळ सध्या रा. मीरकवाडा जेटी रत्नागिरी) समित हा वैभवी खेडेकर यांच्या मिनाक्षी नावाच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. 25 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा.सुमारास तो दारू पिऊन बोटीवरून कोणाला काही न सांगता निघून गेला होता. तो नेपाळ या आपल्या गावी जाणार असे गेल्या काही दिवसांपासून बोलत असल्यामुळे त्याच्या गावी त्याच्या वडिलांना तसेच कळवण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी समित गावी आल्यावर कळवतो असे सांगितले होते. दरम्यान,
असल्यामुळे त्याच्या गावी त्याच्या वडिलांना तसेच कळवण्यात आले होते. त्याप्रमाणे त्याच्या वडिलांनी समित ग्रावी आल्यावर कळवतो असे सांगितले होते. दस्यान, समितचे काका आणि खबर देणार अनिल विरबहादुर चौधरी त्याचा सर्वत्र शोध घेत असताना सोमवारी सकाळी ८ वा. सुमारास मिरकरवाडा जेटी क्र.1 येथील समुद्राच्या पाण्यात समित बेशुद्ध अवस्थेत तरंगताना दिसून आला. त्याला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकान्यांनी समितला तपासून मृत घोषित केले, याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












