जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे १५ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजन
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इतर प्रवर्गातील ० ते १८ वयोगटातील
तिरळेपणा (Squint) प्रवर्गातील मुलांचे मोफत तपासणी शिबीर जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे शनिवार १५ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये डोळ्यां संदर्भात समस्या असलेल्या लहान मुलांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम
पर्यवेक्षक राजेश पारधी 9422373188 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











