जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा खेडच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांची भेट

खेड(प्रतिनिधी) जुनी पेन्शन हक्क संघटन खेड समन्वय समिती मध्ये अधिकृत संघटन म्हणून सभेस निमंत्रित करणेबाबत पत्र देण्यात आले. सेवापुस्तके अपडेट् करण्यायाबाबत चर्चा करण्यात आली.

 

नविन शिक्षण सेवक बांधवाबाबत संघटन कडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल व प्रशासकीय कामत मदत केली जाईल.. कै. सुधाकर बिले अनुकंपा प्रस्ताव बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष श्री दिनेश पवार, तालुका सल्लागार  श्री विठ्ठल भिसे , तालुकाध्यक्ष श्री पवन पवार सचिव  श्री राहुल जाधव  व केकान  उपाध्यक्ष कार्यकारिणी बांधव उपस्थित होते.