युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर

 

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात *दिनांक १८ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) भेटीसाठी नेण्यात येणार आहे.*

 

*या सहली दरम्यान विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र, कनकाकुन्नु पॅलेस, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, नेपियर म्युजियम, त्रिवेंद्रम झू आदि स्थळांना भेट देण्यात येणार आहे.*

 

या सहलीचा प्रारंभ मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होईल.*युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे* या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना विमान प्रवासा सोबतच भारतीय अंतराळ संस्था, लघुग्रह अंतराळ प्रक्षेपण व दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे.

 

*इस्रो साठी निवड झालेली विद्यार्थी*

*इयत्ता चौथी*

1.आराध्या अभय नाईक,१९०, शासकीय वसाहत कोणाळ कट्टा

2.दुर्वा रवींद्र प्रभु, 190, कुडाळ पडतेवाडी

3.अर्णव राजाराम भिसे,186, हरकुळ खुर्द गावडेवाडी

4.ओम शामसुंदर वाळके,184, कुडाळ पडतेवाडी

5.शौर्य वीरेंद्र नाचणे,180, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली

*इयत्ता 6 वी*

1.आदित्य देविदास प्रभूगावकर, 174 टोपीवाला हायस्कूल मालवण

2.कर्तव्य तेजस बांदिवडेकर,170 राणी पार्वती देवी सावंतवाडी

3.रेवन अनंत राहुल,170, एस एन एम विद्यालय खारेपाटण

4 वेद राजेंद्र जोशी ,168,एस एम व्ही एम पडेल

5आर्या निलेश गावकर, 164,साळशी नंबर १

*इयत्ता 7 वी*

1.शौनक राजेंद्र जातेकर ,188 पोद्दार कणकवली

2.यशश्री गुरुनाथ ताम्हणकर ,180,मसुरे देऊळवाडा

3.मयंक महेश चव्हाण ,180 पोद्दार कणकवली

4.पारस देवदास दळवी ,174,जवाहर नवोदय सांगेली

5 सोहम बापूशेठ कोरगावकर, 168 राणी पार्वती देवी सावंतवाडी