खेड बस स्थानकातून वृद्ध ची बॅग लांबूवन ९४ हजाराची रोकड लंपास

खेड(प्रतिनिधी)येथील बस स्थानकात  झोपलेल्या ७७ वर्षीय प्रौढाची बॅग लांबवून त्यातील ९४ हजार ५०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबवल्या ची घटना ११ जून रोजी ११.४५ वा च्या दरम्यान घडली

या प्रकरणी  मोहम्मद अ. ऐसान खान वय ७७ वर्षे, व्यवसाग-भंगार गोळा करून विक्री करणे, रा. उंबरशेत पो. केळशी ता. दापोली यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे

११ जून रोजी रात्री ११.४५  वा. चे दरम्याने खेड एस.टी. बस स्टॅन्ड मध्ये फिर्यादी हे विश्रांती करणेकरीता फिर्यादी यांचे सोबत असलेली काळसर निळसर रंगाची बॅग डोक्याखाली घेवुन विश्रांती करत असताना प्रवासा दरम्याने फिर्यादीला शारिरीक थकवा आल्याने  फियांदीला झोप लागल्याने झोपेचा फायदा घेवुन फिर्यादीच्या डोक्याखाली असलेली बॅग  अज्ञात इसमाने चोरुन घेवुन जावुन त्यातील ९४५००/- रुपये रोख रक्कम व त्यामध्ये असलेले कपडे चोरले