मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी व मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे आणि सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यात इन्सुली डोबाशेळ येथील फ्रान्सिस स्कॅन मिशनरीज ऑफ द क्रिस्त द किंग अपंग मूकबधिर मुली महिला वसतिगृहात मूकबधिर मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मनसेच्या वतीने नवीन कपडे, खाऊ व खेळणी वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या श्रीम. ब्रिजट वार्घेस यांनी मनसेचे आभार मानले. यावेळी संस्थेच्या ॲटोनीती लोपस, पेन्डि्टा वाझ, व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच सावंतवाडी तालुक्यात निगुडेतील तीन अंगणवाडीत लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी निगुडे अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नुतन निगुडकर, मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाट, साक्षी गावडे उपस्थित होते. इन्सुली अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे बांद्यामध्ये श्रीदेव बांदेश्वर चरणी वाढदिवसानिमित्त अभिषेक करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, मळगाव पंचायत समिती विभागअध्यक्ष राकेश परब, इन्सुली शाखाअध्यक्ष दिनेश मुळीक, शतायु जांभळे, साहिल तळकटकर, विशाल राऊळ, विजय बांदेकर, दिनेश शेर्लेकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.