दापोली (प्रतिनिधी) दापोली तालुक्यातील गरोदर महिला आणि बाळाला वाचवण्यात दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अपयश आले आहे. सायली सनी नागे (28 वर्ष) तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखत असल्याने आज सिजर करून बाळाला जन्म दिला जाणार होता. मात्र त्यापूर्वीच श्वासाला त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले मात्र त्यांचे प्रयत्न तिचा जीव वाचू शकले नाही. सायलीला तीन वर्षाची एक लहान मुलगी आहे.
मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नातेवाईकांनी या महिलेला शुक्रवारी दवाखान्यात आणलं दवाखान्यात आणले त्याचवेळी त्यांचा ऑक्सिजन हा 40 ते 45 दरम्यान होता. त्यामुळे अन्य ठिकाणच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. काकडे, फिजिशियन डॉ. सुयोग भागवत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भागवत, अन्य स्टाफ नर्स यांनी वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी सायली उपजिल्हा रुग्णालयात आली होती त्यावेळेला तिची प्रकृती चांगली होती, सोनोग्राफीचा रिपोर्टही नॉर्मल आला होता अशी माहिती दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.












