राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग चॅम्पियनशिप मध्ये केल महाराष्ट्राच नेतृत्व
ओटवणे(प्रतिनीधी) भालावल गावचा सुपुत्र आणि सध्या अंबरनाथ, ठाणे येथे राहणाऱ्या यश परब या युवकाने नुकत्याच पार पडलेल्या national junior powerlifting championship २०२४ मध्ये महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करताना देश पातळीवर आपल्या सुवर्ण कामगिरीने ठसा उमटविला. यश परब याने बऱ्याच स्पर्धामध्ये आपल्या यशाचा ठसा उमटविला मात्र महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत मिळविलेल्या यशाने महाराष्ट्राच नाव पॉवरलीफ्टिंग मध्ये सुवर्ण अक्षराने कोरले. ही स्पर्धा राजस्थान येथील श्री गंगानगर येथे पार पडली. देश भरातून आलेल्या स्पर्धकांमुळे यश याच्यासाठी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणे सोपे नव्हते मात्र यश परब याने अनेक मातब्बर स्पर्धकांवर मात करीत एकूण ६८० कि. ग्रा.वजन उचलून स्पर्धेत विक्रमी चार सुवर्ण पदक आणि स्ट्राँगमॅन टायटल जिंकले या स्पर्धेदरम्यान त्याने स्कॉटिंग स्पर्धेत २५५ कि. ग्रा. वजन उचलून राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली.यश परब याच्या यशात त्याच्या आईवडीलाबरोबर त्याचे प्रशिक्षक कौशल सुमेध यांचा मोठा वाटा आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल भालावल ग्रामस्थ पालक तसेच मिञवर्गांकडून अभिनंदन करण्यात येत आहे व त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.












