छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रवाना
कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात दिनांक १८ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) भेटीसाठी नेण्यात आले.या सहली दरम्यान विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र, कनकाकुन्नु पॅलेस, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, नेपियर म्युजियम, त्रिवेंद्रम झू आदि स्थळांना भेट देण्यात येणार आहे.
या सहलीचा प्रारंभ आज मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सौ. संजना संदेश सावंत,अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी वैष्णवी सुतार, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, केंद्र प्रमुख नितीन कदम, सुरेश हरकुळकर, विजय भोगले, माजी केंद्र प्रमुख संतोष जाधव, विजय मसुरकर, सुहास सावंत,सुगंध तांबे, निलेश ठाकुर, आनंद तांबे, अजित कदम, आणि शिक्षण प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.









