जय भवानी…जय शिवाजी” च्या गर्जनेत पालीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

वार्ताहर | पाली : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी.. असा जयजयकार करत तालुक्यातील पाली तिठा येथे आज ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
दुग्धाभिषेक,शिवपूजन करून श्री शिवराजे यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली . यावेळी दिनेश खोत,प्राचार्य सुदेश कांबळे,व्यापारी महासंघ अध्यक्ष विश्वास सावंत, तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितिन कांबळे,सुंदर हिरवे, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत राऊत ,रमेश तेंडुलकर,राजाराम सावंतसर, स्वप्नील सावंत,शेखर सुर्वे, उमेश सावंत,चिन्मय सावंतदेसाई, प्रथमेश पांचाळ,झापडेकर मॅडम अनेक शिव भक्त उपस्थित होते.

 

गेली १९ वर्षे हा ऐतिहासिक जिल्ह्यातील आरंभी चा सुवर्णक्षण पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पाली तिठा येथे साजरा होत असतो. श्री शिवछत्रपतींना दुग्धाभिषेक नंतर पवित्र वातावरणात श्री शिवपूजनाने व जोषपूर्ण उत्साहात श्री शिवघोष करत मुसळधार पावसाची पर्वा न करता शिवप्रेमींनी यंदाचा “श्री शिवराज्याभिषेक” सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी आवर्जून सदिच्छा व विशेष पाठबळ दिले.महाराष्ट्र क्रिकेट संघटना उपाध्यक्ष, सिंधुरत्न योजना सदस्य किरण सामंत, श्रीलक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई खोत यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या
आयोजकांतर्फे गुरुनाथ गराकटे(बाबा) यांनी सर्वांचे आभार मानले