खेडात पावसाची संततधार

खेड(प्रतिनिधी) खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. खेड तालुक्यात ७२.४२  मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात आत्तापर्यंत ५०७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात  पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह सगळेच दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. काल रात्री पासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली असुन शेतकरी शेतीची कामे उरकण्यात दंग आहे. गेले चार दिवस पावसाने उन पावसाचा खेळ सुरू केल्याने शेतकरी राजा चिंतेत होता.  सकाळ रात्री पासूनच पावसाने संततधार सुरुवात केली आहे.

पावसाची संततधार सुरू असल्यामुळे खेड – भरणे परिसरात  बाजारहाटासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांची देखील पावसाने तारांबळ उडवून दिली. पावसाच्या संततधारे मुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे.