खेड (प्रतिनिधी) पुणे कोकणवासिय मराठा समाजाचा १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात . स्नेहमेळाव्यासह समाजातील व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार सन्मान सोहळा पार पडणार आहे. याचवेळी महिलांचा मंगळागौरीचा कार्यक्रमही होणार आहे.
ह.भ.प. शिवाजी मोरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात प्रकाश मोरे (देवघर), मनोहर यादव, आंबवली), अर्चना चव्हाण (कुंभवली), रेश्मा मोरे. निगडे), कृष्णा मोरे (निगडे), मेजर भगवान उतेकर (वावे), संजय शिंदे (खडपी), मेघना सकपाळ (धामणंद) गजानन सकपाळ (आंबये), अनिल सकपाळ (आंबये राम उतेकर (धामणंद), रमेश जाधव (ऐनवरे), अनुराग जाधव (वाकवली), सायली कदम (निर्व्याळ) यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी वसंत मोरे, सदाशिव चव्हाण, रघुनाथ शिंदे, मुकुंद जाधव, रामचंद्र मोरे, दत्तात्रय पाष्टे, वसंत चव्हाण, अरविंद म्हापदी, मधुकर मोरे, बाळकृष्ण मोरे, आप्पाजी मोरे, तानाजी शिंदे, दिनेश जाधव, सुनील साळुंखे, राजेंद्र जाधव, चंद्रकांत जाधव यांच्यासह समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.









