इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठेवला ठपका
खेड(प्रतिनिधी)
रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी काँग्रेसच्या ६ कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या बाबत रितसर खुलासा करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी खलिल सुर्वे, संदीप धारिया, विजय जैन, अजिम नासर जसनाईक, मंगेश सुर्वे, भागवत अशी कार्यकर्त्यांची नावे आहेत. या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मदत केल्याचा ठपका करत प्रचारापासून अलिप्त राहून राजकीय भूमिका पक्षहिताला बाधा आणणारी असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी चिघळणार आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ कोणती भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे










