विदयार्थ्यांसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर

xr:d:DAFvPyFO-YM:444,j:6688255024920480454,t:23111810

 

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.शिबीरात पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

शिबीर सावंतवाडी येथे खासकीलवाड्यात राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकरांच्या वाड्यात घेण्यात येईल. रविवार दि. ३० जून रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत शिबीर घेण्यात येणार आहे.

तरी इच्छुक विदयार्थ्यांनी कौस्तुभ पेडणेकर मो. नं. 8007382783 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करायची आहे.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.