कणकवली कोरल अपार्टमेंट महिलांकडून वटपौर्णिमा साजरी

 

आचरा l अर्जुन बापर्डेकर :वटपौर्णिमे निमित्त कणकवली बांधकरवाडी कोरल अपार्टमेंट मधील महिलांनी पतीला दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळण्यासाठी वटवृक्षाची पूजा करत सात फेरया मारत वटपौर्णिमेचे व्रत केले.

जेष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते.विवाहित स्त्रीया पतीला दिर्घायूष्य आणि उत्तम आरोग्य मिळावे म्हणून वटवृक्षाची पूजा करून सात फेरया घालतात .पर्यावरणाच्या द्रूष्टीने वटवृक्षाचे महत्त्व मोठे आहे.सर्वात जास्त आँक्सिजन उत्सर्जित करणारा व्रूक्ष म्हणून वटवृक्षाचे महत्त्व आहे. अशा सण व्रतांमधून व्रूक्षांचे महत्त्व अधोरेखित होते. कोरल अपार्टमेंट मधील सौ विनिता डेगवेकर, सौ अंजली बापर्डेकर, सौ सांची घाडीगांवकर, सौ सुवर्णा जाधव आदी महिलांनी कणकवली दत्त मंदिर येथील वटवृक्षाची पूजा करून वटपौर्णिमेचे व्रत केले