संचालक दिलीप रावराणे यांची उपस्थिती
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. तालुक्यात इयत्ता दहावी प्रथम क्रमांक – श्रेया संदीप शेळके (आचिर्णे विद्यालय), द्वितीय क्रमांक – मानसी अरविंद चव्हाण (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), तृतीय क्रमांक – प्रीती नितिन रावराणे (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), तर बारावी मध्ये प्रथम क्रमांक – निरजा प्रदीप मांजरेकर (आचिर्णे महाविद्यालय), द्वितीय क्रमांक – प्रफुल प्रवीण मोरे (कै. हेमंत केशव रावराणे महाविद्यालय वैभववाडी), तृतीय क्रमांक – शुभम दिलीप परब ( कै. हेमंत केशव रावराणे महाविद्यालय वैभववाडी), या गुणवंत विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षक संदिप शेळके, श्रेया शेळके, व धनंजय पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैभववाडी शाखा व्यवस्थापक प्रभाकर गायकवाड, विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, भुईबावडा शाखा व्यवस्थापक धनंजय पडवळ, सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे, कर्मचारी जयेश सावंत, व्ही. आर. चांदोडे, राहुल कदम, अस्मिता रावराणे, अमीन जेट्टी, सुरेश शेळके, अजित हुंबे, सचिन रावराणे, अनंत पवार व कर्मचारी उपस्थित होते.












