भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
प्रकाश मेस्त्री मित्रमंडळ आणि चिंदर भाजप यांचा पुढाकार
आचरा–अर्जुन बापर्डेकर : भारतीय जनता पार्टी मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा वाढदिवस आज चिंदर गावठणवाडी सिद्ध महापुरुष नाथमठ परिसरात प्रकाश मेस्त्री मित्र मंडळ व चिंदर भाजपच्या वतीने विविध औषधी झाडे, फुलं झाडें यांची वृक्ष लागवड करून करण्यात आला.
यावेळी सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस प्रकाश मेस्त्री, चिंदर तंटामुक्त अध्यक्ष संतोष गांवकर, विरेश पवार, दत्ता वराडकर, विजयी उर्फ बाबू कदम, छोटू साटम, रवि घागरे, सदाबुवा गोसावी, सुचिता राणे, ओमकार गोसावी, बाबू परब, विनया गोसावी, गिरीश भावे, रविंद्र गोसावी, हर्षदा परब, सुचिता राणे, सुखस्वप्ना पवार, श्रीकांत कानविंदे, नंदू वराडकर आदी उपस्थिती होते.












