
लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र कोटकर यांना अमरावती येथील कला जीवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.
कला जीवन बहुउद्देशीय संस्था ढगा अमरावती त्यांच्या वतीने दरवर्षी समाज विधायक काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार करता संपूर्ण महाराष्ट्र मधून दोन हजार लोकांचे प्रस्ताव आले होते त्यातून 50 लोकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. यामध्ये गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र आकाराम कोटकर यांना ‘समाजसेवेसाठी दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड 2024’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
हा मानाचा पुरस्कार वितरण सोहळा पुण्याई सभागृह पुणे येथे पार पडला .सदर पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. असून प्रमुख उपस्थित मान्यवर कलाजीवन बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, रोटरी क्लब पुणे अध्यक्ष सारंग बालंखे, अभिनेता /दिग्दर्शक पियुष भोंडे, किरण इंगळे, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 31 31 उपप्रांतपाल सुमय्या पठाण, सेलिब्रिटी फॅशन डिझाईन राज चमरे, अॅक्टर मॉडेल पराग भोंडे, डॉक्टर अलका नाईक, मोनिका इंगळे, उमेश काळमेघ, नितीन ठाकरे उपस्थित होते.
.
गवाणे गावचे पोलीस पाटील श्री. रविंद्र आकाराम कोटकर यांना याआधी या वर्षातील दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पोलीस पाटील म्हणून सेवा करत असताना सामाजिक क्षेत्रात ते गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ओळखपत्र, विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च, सामाजिक उपक्रम राबवणे ,जाखडी नृत्य आणि नमन या लोककलेतून समाज प्रबोधन करणे आधी गोष्टींचा समावेश आहे. एका वर्षात तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारे हे जिल्ह्यातील व राज्यातील पहिले पोलीस पाटील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











