दापोली (प्रतिनिधी)नवरत्न शिक्षण संस्थेच्या सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला अधिक सशक्त व सुंदर बनविण्यासाठी
कै . ताई भागवत यांचे स्मरणार्थ नंदकिशोर भागवत यांनी विद्यालयाला कायमस्वरूपी पक्के फॅब्रिकेटेड रंगमंच शेड तयार करून देऊन विद्यालयाची एक मोठी भौतिक सुविधा पूर्ण करून दिली आहे दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी शाळेचा मोठा खर्च रंगमंच तयार करण्यासाठी होत होता शाळेची ही गरज ओळखून संस्था पदाधिकारी यांनी श्री भागवत साहेब यांच्याकडे पक्के फॅब्रिकेटेड रंगमंच तयार करून देण्याची विनंती केली होती त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता तात्काळ ही मागणी मान्य केली व सुंदर असे रंगमंच शेड उभे करून दिले शाळेने रोपे महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानंतर ही मिळालेली पहिली व अतिशय अनमोल अशी देणगी आहे
यापूर्वीही कै. ताईंनी शाळेला 78 गुंठे जमीन मोफत दिली होती आज त्याच जागेवर एक सुंदर असे माध्यमिक विद्यालय उभे आहे त्यांच्या या दानशूर वृत्ती मुळे सारंग पंचक्रोशीतील अनेक गरीब हुशार व होतकरू विद्यार्थी या शाळेमध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन घडत आहेत.या शाळेच्या जडणघडणीमध्ये भागवत परिवाराने मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळे शाळेची वाटचाल यशस्वी आणि प्रभावी होण्यास मोलाची मदत होत आहे
कै. ताईंच्या नंतर त्यांचे सुपुत्र श्री नंदकिशोर भागवत साहेब आणि त्यांचा परिवार यांचे संस्थेशी व शाळेशी अतिशय घट्ट असे नाते व जिव्हाळा निर्माण झाला आहे
दरवर्षी एसएससी परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना न चुकता सलग 24 वर्ष रोख रकमेचे पारितोषिक देऊन यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव ते सातत्याने करत आहेत त्यांच्या या प्रेरणेतून आज अनेक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां ची वेळोवेळी चांगल्या कामाबद्दल कौतूक व प्रशंसा करून प्रेरणा देण्याचे काम ते करत आहेत. खरोखरच भागवत परिवाराने शाळेला दिलेल्या वरील सर्व योगदान बद्दल कौतुक करावं तेवढे थोडे आहे भविष्यात त्यांची प्रेरणा त्यांचे मार्गदर्शन शाळेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही.
कै. सुनंदा उर्फ ताई भागवत यांचे व भागवत परिवाराचे आम्ही नवरत्न शिक्षण संस्था व सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय परिवार आपले सदैव ऋण व्यक्त करण्यात आले.









