सरस्वती विद्यामंदिर कुवळे शाळेत मोफत वह्यावाटप

 

शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील कुवळे -रेंबवली गावचे सरपंच सुभाष कदम यांनी सरस्वती विद्यामंदिर कुवळे नं १ या प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या.
यावेळी उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल परब, मुख्याध्यापक शिरगावकर सर, शिक्षक वर्ग,पालक विद्यार्थी उपस्थित होते.

 

या उपक्रमाबद्दल सरपंच सुभाष कदम यांचे शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, पालक वर्ग यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन : कुवळे शाळेतील विद्यार्थ्यांना सरपंच सुभाष कदम यांनी मोफत वह्या वाटप करण्यात आले.