*माखजन |वार्ताहर* समर्थ भारत अभियान पिंपरी चिंचवड यांचे तर्फे राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शालेय गटांसाठी खुली राहणार आहे.विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना नाव नोंदणी साठी आवाहन करण्यात आले आहे.
ह्या स्पर्धेत बालवाडी साठी १ ते ५ मनाचे श्लोक छोटा व मोठ्या गटासाठी १ ते १० श्लोक,१ ली व २ री साठी १ ते २०,३री व ४ थी साठी १ ते ३५,५ वी व ६ वी साठी,१ ते ५० श्लोक,७ वी ते ८ वी साठी १ ते १ ते ६०,९ वी व १० वी साठी १ ते ७० श्लोक तर पालक,शिक्षक,व सर्वांसाठी असलेल्या खुल्या गटाला १ते ७० मनाचे श्लोक पाठांतरासाठी असणार आहेत.प्रत्येक गटातून पाहिले तीन क्रमांक काढले जाणार आहेत तर पुढच्या दोघांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहेत.
प्रत्येक शाळेत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.तर प्राथमिक फेरी ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.ह्या स्पर्धेत दोन परिक्षक प्रत्येकी ५० गुण देणार आहेत.यामध्ये पाठांतरासाठी २०,उच्चारा साठी १५,प्रभावासाठी १०,चालीसाठी ५अशा गुणांची विभागणी असणार आहे.अधिक माहिती साठी रत्नागिरी विभाग प्रमुख डॉ.निशिगंधा पोंक्षे/(९९७५८५४५६५)या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.










