श्री.निरंजन डावखरे यांची आय.सी.एस. महाविद्यालयास भेट

 

खेड (प्रतिनिधी) येथील आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्री.निरंजन डावखरे यांनी भेट दिली. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले यांच्यां हस्ते त्यांचे व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

माजी आमदार श्री.धैर्यशील पाटील यांनी श्री.डावखरे यांचा परिचय करून देत त्यांच्या समग्र कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. ॲड.आनंदराव भोसले यांनी श्री.निरंजन डावखरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून, एक चारित्र्यवान उमेदवार अशी त्यांची प्रशंसा केली. आपल्या मनोगतात श्री.निरंजन डावखरे यांनी संपूर्ण कोकणात ग्रीन स्कूल ही संकल्पना आपण राबवणार असून त्याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे सुतोवाच केले व इतर उपक्रमांची माहिती दिली.
भेटीदरम्यान भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार श्री.धैर्यशील पाटील, भाजपचे खेड शहराध्यक्ष श्री.अनिकेत कानडे, सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक श्री.संजय बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ.अनिता आवटी, महावि