केसरी येथे व्यवसायीक काजू लागवड मार्गदर्शन

सावंतवाडी – केसरी येथे व्यवसायीक काजू लागवड मार्गदर्शन घेण्यात आले.डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस – ओरोस यांचा वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी कृषी दुत आलोक दळी , वासुदेव राऊळ , हणमंत खेड ,हर्षल राणे , सिद्धार्थ उलागड्डे , देवनारायणन.एस , तनिष्क ए.एस. आदी उपस्थीत होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठीकेसरी सरपंच स्नेहल कासले,उपसरपंच संदीप पाटील,सदस्य गुरुनाथ कासले,कृष्णा सावंत, केंद्र चालक श्रावणी नाईक,कृषि सेवक प्रदीप सावंत,जि. प. प्राथमिक शाळा शिक्षक: सुनील जाधव सर आदींचे सहकार्य लाभले.

कृषी महाविद्यालय किर्लोस,ओरोसचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा.गोपाल गायकी, प्रा. महेश परुळेकर, प्रा.सुयश राणे यांचे मार्गदर्शन लाभले.