गयाळवाडी येथील बंगल्यासमोर पार्क केलेली एको गाडी चोरली; अज्ञातावर गुन्हा दाखल

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या गयाळवाडी येथील एका बंगल्यासमोर पार्क करुन ठेवलेली 2 लाख रुपये किंमतीची इको गाडी अज्ञाताने चोरुन नेली. ही घटना रविवार 23 जून रोजी रात्री 10 ते सोमवार 24 जून रोजी सकाळी 7.30 वा. कालावधीत घडली आहे.

 

याबाबत जीवन मोहन डोर्लेकर (35,रा.गयाळवाडी स्वरुपानंद वसाहत यशोधन बंगला,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, जीवन डोर्लेकर यांनी आपल्या माकलीची सिल्वर रंगाची सन 2012 चे मॉडेल इको कार (एमएच-08-झेड-0912) आपल्या बंगल्या समोर उघड्यावर पार्क करुन ठेवलेली होती. ती अज्ञाताने चोरुन नेली. ही बाब सोमवारी सकाळी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.