परुळे | शंकर घोगळे : परुळेबाजार ग्रामपंचायती ला कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्रामस्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांबद्दलचा पुरस्कार परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे.
१ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे. मा श्री धनंजय मुंडे कृषिमंत्री मा. प्रशांतकुमार गुलाबाराव पाटील, कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या प्रतिष्ठानमार्फत विविध स्तरावर कृषी व ग्राम पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ति यांना सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा ग्रामस्तरांवरील बहुमान ग्रामपंचायत परुळेबाजार ला जाहीर झाला आहे.











