धक्का मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण 

 

 

अमित खोत | मालवण : रक्तदान चळवळीसह विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने फातिमा कॉन्व्हेंन्ट आणि कन्याशाळा येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

 

‘एक हात मदतीचा’ असे ब्रीदवाक्य घेऊन मालवण येथील सामाजिक क्षेत्रात धक्का मित्रमंडळ नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवित असते. मालवण मधील रक्तदान चळवळीतही या मंडळाचे मोठे योगदान असून सातत्याने रक्तदान शिबीरे आयोजित केली जात असतात. तसेच कोरोना काळातही या मंडळाने नागरिकांना विविध सेवा दिल्या. मंडळाचे सामाजिक कार्य सुरूच असून मालवण मधील फातिमा कॉन्व्हेंन्ट मधील मुलींना वह्या, पेन, छत्री आणि इतर शालोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. तसेच कन्याशाळा प्रशालेतील गरजू १५ मुला-मुलींना शालेय गणवेश तसेच आठवी ते दहावी पर्यंतच्या ७५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या सेवेबाबत दोन्ही संस्थांमधील पदाधिकारी, शिक्षक यांनी धक्का मित्रमंडळाचे आभार मानले.

 

यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य हेमंत शिरगांवकर, देवा तोडणकर, संजय गावडे, बाबू डायस, भूषण पिसे, नितेश जाधव, प्रणव गावकर, राहुल केळूसकर, नितीन कोटीयान, अनिकेत मयेकर, अनिकेत चव्हाण, रोहित चव्हाण, शंकर पाटकर, भालचंद्र आपकर, गौरेश कांबळी, मयु पारकर, केशव साठे, प्रशांत हिरनवाळे यांसह अन्य उपस्थित होते.