चौके हायस्कूलमध्ये येथे उद्या बहुविध कौशल्य अभ्यासक्रम कक्षाचा उद्घाटन सोहळा..

रोटरी क्लब माहीम मुंबई यांचे विशेष आर्थिक सहाय्य

चौके -प्रतिनिधी :-चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित भ ता चव्हाण म मा विद्यालय चौके विद्यालयात येथे उद्या शनिवार दिनांक 29/ 7 /2024 रोजी सकाळी 9.30 वाजता बहुविध कौशल्य अभ्यासक्रम कक्षाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. सदर उपक्रमाचे उद्घाटन Cause to Connect Foundation चे संस्थापक व संचालक माननीय श्री.अनिरुद्ध बनसोड आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.डॉ. प्रसाद देवधर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष मा.श्री जगदीश परब साहेब,बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री.दीपक भोगटे,रोटरी क्लब माहीम मुंबई च्या सदस्य मा. सौ. रश्मी पाटील, स्थानिक समिती अध्यक्ष श्री.बिजेंद्र गावडे, संस्था खजिनदार श्री.सुरेश चव्हाण, सरचिटणीस श्री.संतोष धुरी, मुख्याध्यापिका सौ.रसिका गोसावी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. शामसुंदर मेस्त्री तसेच सर्व मुंबई संस्था पदाधिकारी आणि स्थानिक संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई केल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या प्रशालेमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रयत्न मध्ये होती. यासाठी स्थानिक समिती अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे यांनी वेळोवेळी माहिती घेऊन या संदर्भात पाठपुरावा केला होता. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार शिक्षणाची मुभा देण्यात आलेली आहे याचा विचार करून पुणे येथील उगम या संस्थेमार्फत cause to connect उपक्रमांतर्गत प्रशालेमध्ये सुसज्ज अशी कौशल्य आधारित प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.
सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन,मेकॅनिकल, बागकाम, विविध पदार्थ तयार करणे त्याचप्रमाणे बांधकाम करणे त्याविषयी सखोल ज्ञान दिले जाणार आहे. जेणेकरून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला आवडीचा व्यवसाय निवडणे सोपे जाऊ शकते.

 

सदर उपक्रमासाठी रोटरी क्लब मुंबई माहीम यांचे विशेष आर्थिक सहकार्य लाभले आहे.रोटरी क्लब माहीमच्या सदस्या सौ. रश्मी पाटील, तसेच बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण चे कार्याध्यक्ष श्री दीपक भोगटे यांची हा उपक्रम सुरू करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षण प्रेमींनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापिका सौ रसिका गोसावी मॅडम आणि स्थानिक समिती अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे यांनी केले आहे.