डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोसचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सावरवाड येथे राहत असून त्यांनी आपल्या निवासस्थानी अझोलाची शेती व गांडूळ खताची निर्मितीचे प्रकल्पाचे प्रात्यक्षिक युनिट तयार केले आहे.
प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बी.के. गावडे, डॉ. विलास सावंत, डॉ. केशव देसाई, बी.वी. काजरेकर यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले. यावेळेस कृषिदुत अथर्व मठकर, लक्षदिप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली, अनिरुद्ध.पी, अरुणदेव. सी.पी यांनी यांनी तयार केलेल्या युनिट ची सविस्तर माहिती दिली. सदर प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, डाॅ.विकास धामापूरकर, प्रा. गोपाल गायकी, डॉ. बापू भोगटे, प्रा. भावना पाताडे यांचे मार्गदर्शन लाभले.












