इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षपदी डॉ. स्वप्ना करे,

 

नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण, सचिवपदी ऋचा गांधी

रत्नागिरी । प्रतिनिधी : इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कारवांचीवाडी येथे संपन्न झाला. पदग्रहण सोहळ्यात प्रतिस्थापना अधिकारी म्हणून सौ. वैशाली लोखंडे (रोटरी इनरव्हील जिल्हा अध्यक्ष) लाभल्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी जिल्हा ३१७० चे भावी प्रांतपाल रोटे. अरुण भंडारे व रोटे. बिपिनचंद्र गांधी, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष उपस्थित होते आणि त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात रोटे. अरुण भंडारे यांनी रोटरी परिवारात महिलांचे योगदान महत्वाचे आहे आणि सामाजिक सेवेत महिला विकासाची आवश्यकता योग्य पद्धतीने ओळखतात असे सांगितले. सौ. वैशाली लोखंडे यांनी मार्गदर्शनात सांगितले कि महिला सामाजिक सेवेत नवीन-नवीन उपक्रम अंगीकारत आहेत. महिलांचे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी इनरव्हील क्लब हे महत्वाचे काम करतात.

 

यावेळी डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी अध्यक्षपदाचा, सौ.रुचा गांधी यांनी सचिवपदाचा, सौ.सुवर्णा चौधरी यांनी कोषाध्यक्ष पदाचा, सौ.रेखा साळुंखे यांनी आयएसओ पदाचा, डॉ.प्रियांका कांबळे यांनी संपादिका पदाचा पदभार स्वीकारला. सर्व महिला सभासदांना पिन प्रदान करण्यात आली. कुवारबावच्या सरपंच सौ.मंजिरी पाडाळकर आणि प्रख्यात बॅडमिंटनपटू.सौ.सरोज सावंत यांना क्लब च्या नवीन सदस्य म्हणून पिन प्रदान करण्यात आली. नूतन अध्यक्ष डॉ. स्वप्ना करे यांनी इनरव्हील क्लबची माहिती देत आगामी संकल्प मांडले.

 

या कार्यक्रमात एका गरजवंत महिलेला डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे मॅडम यांच्याकडून शिलाई मशीन प्रदान करण्यात आली अणि १० शालेय विद्यार्थीनीना अध्यक्ष डॉ. स्वप्ना करे यांचेकडून दप्तर देण्यात आली.

 

कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे रोटे. राजेंद्र कदम, रोटे .केतनकुमार चौधरी , रोटे. वामन सावंत, रोटे. हिराकांत साळवी, रोटे. संदिप करे तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी चे रोटे. श्रीकांत भुरके, रोटे. पेडणेकर, रोटे. निलेश मुळे ,लोटे इनर व्हील क्लब च्या माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच अनेक शुभचिंतक उपस्थित होते .