ओटवणे(प्रतिनीधी) बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती ,सावंतवाडी आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी१५० व्या जयंती निमीत्त अभिवादन सभा सावंतवाडी समाज मंदीर हॉल येथे रविवारी ३० जून सकाळी१० .३० वाजता आयोजीत करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव जाधव, अध्यक्ष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती,सावंतवाडी, प्रमुख उपस्थिती जगदीश चव्हाण,उपाध्यक्ष समन्वय समिती सावंतवाडी आणि प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. देविदास बोर्डे – अभ्यासक फुले, शाहू आंबेडकर, विचारधारा.या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मोठ्या संख्येने फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी कडून करण्यात आले आहे .











