खेड(प्रतिनिधी) गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर आहेत. आरक्षित तिकिटे न मिळाल्याने गावी जायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे. यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मुंबई- चिपळूण गणपती स्पेशल चालवून दिलासा द्यावा, अशी मागणी मराठा ९६ कुळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने गावी येत असतात. गणेशोत्सवासाठी १२० दिवस आधीच आरक्षण करण्याच्या सुरूवातीलाच आरक्षण फुल्ल झाले. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्तास तिकिट खिडक्यांवर उभे राहून देखील चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.












