खेड(प्रतिनिधी)येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या गाडी मध्ये शिरत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने विवाहितेचे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरल्याची घटना २५ एप्रिल रोजी सांयकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली
या प्रकरणी रोशनी बाळाराम गुरव ४३ मूळ गाव कोचरी लांजा सद्या रा मालाड पूर्व यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
यातील तक्रारदार या त्यांचे मालकिची पर्स त्यामध्ये मंगळसुत्र असलेली पर्स घेवुन ट्रेनमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने मंगळसुत्र पर्स ची चैन खोलुन चोरून नेले










