एक हक्काचे व्यक्ती आज आपल्यातून निघून गेले ; अतिशय दुःखद घटना

मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या निधनानंतर जिप माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केल्या श्रद्धांजली पर भावना

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय सुभाष नाईक (वय 54) यांचे रवीवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अतिशय दुःखद घटना, एक हक्काचे व्यक्ती आज आपल्यातून निघून गेले. भावपूर्ण श्रद्धांजली. अश्या शोक भावना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत.

संजय नाईक सर यांनी पेंडुर गावचे सरपंच पद भूषवले. मालवण तालुका माध्यमिक पतसंस्थेचे माजी चेअरमन, भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते, भंडारी समाजाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. जि. प. सिंधुदुर्गच्या महिला व बाल कल्याण समिती माजी सभापती श्रावणी संजय नाईक यांचे संजय नाईक हे पती होत.

त्यांचे अकाली निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अश्या श्रद्धाजंली पर भावना अशोक सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत.