तालुक्यातील कणगवली तेलीवाडी येथील घटना
लांजा (प्रतिनिधी) विजेचा शॉक लागून गाईचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी तालुक्यातील कणगवली तेलीवाडी येथे सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कणगवली तेलीवाडी येथील मारुती श्रीधर चव्हाण यांनी आपली गुरे रानात चरायला सोडली होती. त्यातील एका गाईला कणगवली तेलीवाडी वेताळ देव मंदिर या ठिकाणी विजेचा शॉक लागून या गाईचा मृत्यू झाला आहे .यामध्ये मारुती चव्हाण यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .
याबाबतची माहिती यांचा पोलीस ठाणे, कृषी अधिकारी तसेच महावितरण अधिकारी यांना देण्यात आली आहे.











