विधान भवनातून | संतोष वायंगणकर
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असताना आज मुंबईत मात्र पावसाची एखादी सर येतानाच उन्हाळा असावा अस उन्ह बाहेर असताना बाहेर फारसा पाऊस नव्हता.. विधीमंडळाच कामकाज ही एखादा अपवाद वगळता कामकाज शांत शांतच होत. आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच सावट विधीमंडळाच्या कामकाजातही दिसून आल. दिवसभराच्या विधीमंडळाच्या कामकाजात काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.
मात्र विधीमंडळाच्या परिसरात विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते आ. अंबादास दानवे आणि आ. प्रसाद लाड यांच्यात लोकसभेतील लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधीं यांनी लोकसभेत जे बोलले त्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले.. यातूनच विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे आणि आ. प्रसाद लाड यांच्यात बोलण्यातून काही घडल तशी चर्चा विधीमंडळाच्या परिसरात होत होती. यातच आज भारतीय जनता पार्टीने विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या सदस्य निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री मराठवाड्यातील नेत्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुखे, अमित गोरख, योगेश टिळेकर यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पक्षाचकडून जाहीर करण्यात आले. तर काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
11 जुलै रोजी विधानपरिषदेची निवडणूक आहे विधानपरिषदेत कोणाची वर्णी लागणार या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र विधानपरिषदेची हि निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे देखील लवकरच स्पष्ट होइल. आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत अपेक्षे प्रमाणे आ. निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रीक साधली आहे. तर यापूर्वी विधानपरिषदेत विधानसभा निवडलेल्या सदस्यातून अनिल परब निवडून गेले होते. आज मात्र अनिल परब मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. मागील अनेक वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व शिवसेना नेते माजी मंत्री स्व. प्रमोद नवलकर यांनी केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे निवडून आल्याने कोकणातील पदवीधरानीही भाजपा महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे.
या निवडणूक निकालामुळे सोमवार असूनही विधीमंडळाच्या कामकाजात शांतताच होती. मात्र आजच्या कामकाजात पणिपुरवठा विभागाच्या जलजीवनच्या कामकाजात सुधारणा घडण्या विषयी आ. नितेश राणे यांनी विधानसभेत चर्चेत सहभाग घेताना मंत्री गुलाबराव पाटील लक्ष घालतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांचा सद्यस्थितीचा आढावा घेऊन जिल्हानिहाय बैठका घेणार असल्याचे विधानसभेत जाहीर केले. यामुळे महाराष्ट्रातील जलजीवनच्या योजनेतून होणाऱ्या कामांमध्ये सुधारणा घडू शकेल. नीट परीक्षेतील गोंधळा नंतर राज्यामध्ये सर्वत्रच तीव्र पडसाद उमटले.
विधीमंडळातील दोन्ही सभागृहात याचे पडसाद उमटले. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पेपर फुटिबाबतचा नवीन कायदा याच अधिवेशनात आणला जाईल असे सभागृहात सांगितले आहे.












