सामाजिक न्याय संमेलन सप्ताहाचा उद्या सांगता समारंभ

मालवण | प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय संमेलन सप्ताहाचा सांगता समारंभ मंगळवार २ जुलै सकाळी १० वाजता श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने, पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका नूतन परब, बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, प्रमुख मार्गदर्शक सगुण जाधव, सुजित जाधव, संग्राम कासले, सुदीप कांबळे, सुहास मोचेमाडकर, राजीव दिनदयात, शामल सावंत आदी उपस्थित राहणार आहे. या सांगता सोहळ्यात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.