2 July 2024 भविष्यफल.
मेष रास
आज महत्त्वाचे निर्णय लांबणीवर पडतील. अति डिटेल्स मध्ये जाऊ नका. जे जसे काम आहे ते करा. पूर्व अनुभवाचा फायदा होईल.
वृषभ रास
आज अति विचारांमुळे मनावर ताण येईल. भीती, चिंता, तणाव, जाणवत राहील. स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
मिथुन रास
आज तुमची धावपळ होईल. कामासाठी प्रवास करावा लागेल. पैशासंबंधी कामे करावी लागतील. प्रयत्न केल्यास लोन मिळू शकते.
कर्क रास
आज स्वतःसाठी वेळ काढा. टेन्शन मधून जगण्यासाठी थोडी जागा शोधा. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्या. स्वतःच्या सुखासाठी वेळ काढा.
सिंह रास
आज नशीब साथ देइल. चांगल्या बातम्या कळतील. मनाप्रमाणे घटना घडतील. स्त्रियांचा आदर करा. घरात शुभ कार्य ठरतील.
कन्या रास
आज दिवस आनंदात जाईल. कामात टीम वर्क चांगले राहील. नवीन ओळखी होतील. नातेसंबंधात संशयाला जागा ठेवू नका.
तुळ रास
आज तुमचा सगळीकडे वरचष्मा राहील. मॅनिप्युलेशन्स करू नका. तुमचा प्रभाव इतरांवर पडेल. दूरदृष्टीचा फायदा होईल.
वृश्चिक रास
आज योग्य सल्लागार मिळेल. मार्गदर्शन घेऊन काम करा. बॉसच्या विरोधात जाऊ नका. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा.
धनु रास
आज नशिबाची साथ मिळेल. दिवस आनंदात आणि कामात जाईल. इन्व्हेस्टमेंट साठी आणि मौल्यवान धातूच्या खरेदीसाठी चांगला दिवस.
मकर रास
आज जबाबदारी वाटून घ्या एकटे पडल्यासारखे वाटेल न विचारता कोणत्याही कामासाठी होकार देऊ नका.
कुंभ रास
आज भरपूर काम करावे लागेल. नवीन कामे वेळेत पूर्ण करावे लागतील. कामात यश मिळेल. विनाकारण चिडचिड होऊ शकते.
मीन रास
आज दिवसभर एक अनिर्णित अवस्था राहील. तुम्ही कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचू शकणार नाही. अचानक काही कामे समोर येतील. अडचणींचा सामना करावा लागेल.
@Ritikaslifetherapies
Riitu – The TAROT – ASTRO Consultant
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
±++++++++++++









