न्हावेली -,, श्रेयस गावडे
उत्कर्ष सेवा मंडळ,कट्टा कॉर्नर न्हावेली ग्रामस्थ आयोजित २४,२५,२६ एप्रिलपासून दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार रात्री ८ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब,सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव,जिल्हा परिषद सदस्या सौ.अपर्णा सातोसकर,शिवसेना गटनेते तथा पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर,पंचायत समिती सदस्य सौ.धनश्री मराठे,मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण परब व उपाध्यक्ष आनंद आरोंदेकर उपस्थित राहणार आहेत.
त्यानंर २४ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,म्हापण यांचा नाट्यप्रयोग,शनिवार २५ रोजी रात्री ८.३० वाजता आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,आरवली यांचा नाट्यप्रयोग,रविवार २६ रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने,त्यानंतर रात्री ८.३० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,दांडेली आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.












