वृक्षारोपणाबरोबर संवर्धनाचा संकल्प.
मंडणगड : प्रतिनिधी : कृषी दिनाचे औचित्य साधत मंडणगड शहरातील नवयुवक तरुण मंडळच्या वतीने दि.(30 जून) 2024 रोजी किल्ले मंडणगडवर वृक्षारोपण कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले होते. कृषी दिनानिमित्त या सप्ताहात आठवडाभर नवयुवक तरुण मंडळ किल्यावर वृक्षारोपण मोहीम राबणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. पहिल्या दिवशी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वड, पिंपळ, जांभूळ, बदाम आदि जातीच्या सुमारे 150 हूनअधिक रोपांचे रोपण केले.
नवयुवक तरुण मंडळाचे अध्यक्ष समीर लेंढे यांनी यावेळी सांगितले कि, किल्ल्यावर केलेल्या वृक्षारोपणात लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली आहे. किल्ल्यावरील पर्यटकांचा ओघ पाहता किल्ल्यावरील शुशोभिकरणासाठी आघामी काळात शासन दरबारी प्रस्ताव सादर करणार आहोत. मंडळाच्या वतीने येथे नियमित स्वच्छता मोहीमही राबवली जाते. मंडणगड किल्ला हा ऐतिहासिक ठेवा आहे, त्याचे संवर्धन करणे याला प्राधान्य देत येथील पर्यटनातून रोजगार निर्मिती व्हावी असा संकल्प असल्याचे श्री. लेंडे म्हणाले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राहुल कोकाटे, नितेश कामेरीकर, श्रीकांत लेंढे, सुधीर हातमकर, जयेश नगरकर, अर्जुन कामेरिकर, पत्रकार प्रशांत सुर्वे, विजय पवार व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











