शिव खुर्दमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड(प्रतिनिधी)

खेड तालुक्यातील शिवखुर्द कुळेवाडी येथील एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघड झाली.

अविनाश अकुंश पाचांगले (वय ३० वर्षे रा शिवखुर्द कुळेवाडी ता खेड) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे
यातील मयत हा दारुचा अति व्यसनी होता. त्यामुळे त्याचे लग्न वैगेरे झालेले नव्हते काही दिवसापुर्वी तो मोटारसायकल वरुन पडल्याने त्याचे पायाला दुखापत झालेली होती दारुचे व्यसन व दुखापतीला कंटाळुन झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीच्या सह्यायने गळफास घेवुन आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.