चिपळूण येथील भोम मधलीवाडी येथील घटना
रत्नागिरीः प्रतिनिधी
आठ दिवसात 10 लाखांचे कर्ज काढून देतो अशी बतावणी करत महिलेनेच महिलेची 50 हजारांची फसवणूक केली. ही घटना 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा.सुमारास चिपळूण येथील भोम मधलीवाडी येथे घडली आहे.
याबाबत रोहिणी रुपेश चव्हाण (52,रा.भोम मधलीवाडी चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिलेने फिर्यादी महिलेला मी तुला महाराष्ट्र बँकेतून जिल्हा उद्योग केंद्र स्किम अंतर्गत 8 दिवसात कर्ज काढून देते असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करुन तिला 10 लाखांचे कर्ज काढून देण्यासाठी तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले. या घटनेला 9 महिलेन उलटल्यानंतरही फिर्यादी महिलेला कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने रविवार 16 ऑगस्ट रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.












