चिपळूण (वार्ताहर ): तालुक्यातील कुणबी शिक्षक विचार मंच सावर्डे विभाग यांच्या वतीने रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता अनंत शिगवण यांचे निवासस्थानी कुडप रोड सावर्डे येथे गुणवंत विद्यार्थी गौरव आणि सन २०२३ – २४ मद्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सदिच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सावर्डे विभागातील कुणबी शिक्षक वर्ग नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सर्व शिक्षक करीत आहेत.
रविवार दि. ७ जुलै रोजी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा याच कुणबी शिक्षक विचार मंच यांच्या वतीने होणार आहे. त्याच बरोबर वयोमानानुसार २०२३ ते २४ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सुध्दा शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.











