मालवण | प्रतिनिधी : मालवण कट्टा येथील वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, पेंडुर गावचे माजी सरपंच संजय सुभाष नाईक यांचे हृदय विकाराच्या तिव्र धक्याने आकस्मिक निधन झाले. भाजपा नेते निलेश राणे यांनी कै. संजय नाईक यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
अत्यंत दुर्दैवी व मनाला चटका लावून जाणारी ही दुःखद घटना आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अश्या श्रद्धाजंली पर भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या होत्या.











