संस्कार व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचा कृतीतून शिक्षण उपक्रम

 

शेतात केली भात लावणी

चिपळूण (वार्ताहर ) : संस्कार व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचा कृतीतून शिक्षण देण्याचा उपक्रम.आजच्या पिढीला शेतीची ओळख आणि अनुभव मिळावा म्हणून शाळेने एक विशेष उपक्रम राबवला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री पुनमचंद भावसार व अध्यापिका सौ साक्षी भुजंग यांनी केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना भात लावणीच्या अनुभवासाठी शेतात नेण्यात आले.

 

आकाशातून उत्साहात बरसणारा वरूण राजा आणि धरणी मातीने कुशीत घ्यावे असा गुडघ्या एवढ्या चिखलात उभे राहून मुलांनी सौ राजश्री शिगवण व सौ प्रतिभा शिगवण यांच्या शेतात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भात लावणी शिकली व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात व उत्साहात भात लावणी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती कामाची माहिती मिळाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्याचीआणि शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचे महत्त्व समजण्याची संधी मिळावी हा त्यापाठी उद्देश होता व असेच विविध उपक्रम राबवण्याची शाळेची योजना आहे.