लांजा (प्रतिनिधी) शिष्यवृत्ती परीक्षेत लांजा शाळा नं. ५ ने घवघवीत यश संपादन केले असून शाळेच्या ६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.
विशेष बाब म्हणजे राज्याचा निकाल फक्त २४% लागला असताना लांजा नं. 5 शाळेचा निकाल ६१.११% लागला आहे. यातून शाळेने आपल्या शाळेतील मुलांची गुणवत्ता व पालकांचा प्रवेशासाठी ओढा का आहे? हे दाखवून दिले आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये लांजा नं. ५ शाळेतील ६ मुलांनी लांजा तालुक्याची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात लांजा तालुक्यातील २२ मुलांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. या २२ मुलांपैकी ६ मुले ही लांजा नं. ५ या शाळेची असून शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे.याचं वर्षी शाळेतील इयत्ता ५ वी चा विद्यार्थी दीपराज पांचाळ याची नवोदय विदयालय राजापूर येथे निवड झाली आहे.
. तसेच त्याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शहरी विभागातून तालुका गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक व जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा क्रमांक, वेद पिलके याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक व जिल्हा गुणवत्ता यादीत ४७ वा, अंश मसणे तालुका गुणवत्ता यादीत ६ वा व जिल्हा गुणवत्ता यादीत ५९ वा, स्वरा बोडस तालुका गुणवत्ता यादीत ८ वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ६३ वी, आलिया जागीरदार तालुका गुणवत्ता यादीत ९ वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ८५ वी, व रुद्र दैत तालुका गुणवत्ता यादीत ११ व जिल्हा गुणवत्ता यादीत १०३ वा क्रमांक मिळवून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक अमित जाधव, सौ. मयुरी पालकर , सौ. वंदना गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग , केंद्रीयप्रमुख चंद्रकांत पावसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण ,शाळेतील सर्व शिक्षक तसेच शा. व्य. समिती यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले…
या यशाबद्दल संपूर्ण लांजा तालुक्यातून तसेच पालकांकडून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
______________________________________












