युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे देवगड मध्ये स्वागत

सिंधुदुर्ग मध्ये भाजपा युवा मोर्चाचे भक्कम काम आहे. सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे कामानी कार्य ठळकपणे दिसते असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात व्यक्त केले

कृष्णराज महाडिक यांचा दौरा देवगड येथून सुरू झाला. यावेळी त्यांचे स्वागत . युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांनी केले यावेळी माजी आमदार अजित गोगटे. शहराध्यक्ष दया पाटील तालुका सचिव योगेश चांदोसकर महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर नगरसेविका तनवी चांदोस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

महाडिक यांनी बोलताना सांगितले की युवाशक्ती जागर या यात्रेची सुरुवात झाली आहे या शुभारंभ प्रसंगी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनी सहभाग घेत युवकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात दिला.

महाडिक यांनी सांगितले की, मागील पाच-सहा दिवसांचा दौरा अत्यंत सकारात्मक झाला असून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत युवा मोर्चाची टीम भक्कमपणे काम करत आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने राज्यभर युवा मोर्चाचा व्यापक दौरा होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गातील पवनचक्की गार्डनला भेट देताना त्यांनी विशेषतः नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या कार्याचे कौतुक केले. स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. “या भागाचा झालेला विकास आणि वाढलेली पर्यटन चळवळ ही मोठ्या प्रमाणात नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाली आहे,” असे ते म्हणाले.

पवनचक्की गार्डनसारख्या प्रकल्पांमुळे परिसराची अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि पर्यटनवाढ यांना चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या यात्रेच्या माध्यमातून युवा पिढीचे एकत्रीकरण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगत, शिक्षण, रोजगार, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांच्या प्रश्नांवर काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील विविध शासकीय योजना युवक-युवतींपर्यंत तळागाळात पोहोचवण्याचे काम या यात्रेतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरीत, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला नवे बळ मिळाल्याचे चित्र या दौऱ्यातून स्पष्ट झाल्याचे महाडिक यांनी नमूद केले.